योगगुरू बाबा रामदेव यांच्या पतंजली समूहाने भारत संचार निगम लिमिटेड बरोबर हात मिळवणी करून दूरसंचार क्षेत्रात योजना आखली आहे. या योजनेला " स्वदेशी समृद्धी कार्ड " असे नाव देण्यात आले आहे. सध्या सुरुवातीला हे सिमकार्ड केवळ पतंजलिच्या कर्मचाऱ्यांसाठीच उपलब्ध आहे. तर जाणून घेऊयात काय आहे बीएसएनल व पतंजलीचा "स्वदेशी समुर्द्धि प्लॅन" ?
काय आहे प्लॅन..?
१) १४४ रु., ३० दिवस :
या मध्ये १४४ रुपयांचे रिचार्ज केल्यास युझरला देशभरात अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळणार आहे. यासोबतच ३० दिवसांकरिता प्रती दिन २ जीबी डेटा आणि १०० एसएमएसची सुविधाही मिळणार आहे.
२) ७९२ रु., १८० दिवस :
या मध्ये ७९२ रुपयांचे रिचार्ज केल्यास युझरला देशभरात अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळणार आहे. यासोबतच १८० दिवसांकरिता प्रती दिन २ जीबी डेटा आणि १०० एसएमएसची सुविधाही मिळणार आहे.
३) १५८४ रु., ३६५ दिवस :
या मध्ये १५८४ रुपयांचे रिचार्ज केल्यास युझरला देशभरात अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळणार आहे. यासोबतच १८० दिवसांकरिता प्रती दिन २ जीबी डेटा आणि १०० एसएमएसची सुविधाही मिळणार आहे.
इतकंच नव्हे तर सिमचा वापर करणाऱ्या युझरला २.५ लाखापर्यंतचा मेडिकल इन्श्युरन्स मिळणार आहे. तसेच ५ लाखापर्यंतचा लाईफ इन्श्युरन्स मिळणार आहे.
कोणाला मिळेल हा प्लॅन ..?
१) भारत स्वाभिमान न्यास
२) पतंजली योग समिती
३) युवा भारत
४) पतंजली किसान सेवा
यातील कर्मचाऱ्यांना व सदस्यांना ह्या योजनेचं फायदा घेण्यात येईल.
सिम लाँचिंगदरम्यान बोलताना रामदेव बाबा म्हणाले, बीएसएनएल हे स्वदेशी नेटवर्क आहे, पतंजलि आणि बीएसएनएलचे देशाची सेवा करणे हेच लक्ष्य आहे. कंपनीचे लक्ष्य चॅरिटी करणे आहे. आमचे नेटवर्क केवळ स्वस्त डेटा आणि कॉलिंगची सुविधा देत नाहीये तर लोकांना हेल्थ आणि लाईफ इश्युरन्सची सुविधाही देत आहे तसेच स्वदेशी समृध्दी सिम कार्डद्वारे मिळवलेला नफा देशाच्या कल्याणात वापरला जाईल. तसेच पतंजली उत्पादनांवर स्वदेशी समृद्धी सिम कार्डसह ग्राहकांना 10 टक्के सवलत मिळेल.
यावेळी बीएसएनएलचे मुख्य महाव्यवस्थापक सुनील गर्ग हेही येथे उपस्थित होते. त्यांनी पतंजली आणि बीएसएनएलच्या करारांची प्रशंसा केली. ते म्हणाले कि, "पतंजलीची योजना ही बीएसएनएलची सर्वोत्तम योजना आहे. 144 रुपयामध्ये, देशाच्या कोणत्याही भागातून अमर्यादित कॉल करता येतील.आम्ही 2 जीबी डेटा पॅक, 100 एसएमएस देत आहोत. पतंजलीच्या सदस्यांनी आपली ओळख दाखवली पाहिजे आणि तेथे त्यानां काही कागद पत्रांची पुष्टी झाल्यानंतर सिम लवकरच सक्रिय करुन मिळेल."

Comments
Post a Comment