तुम्ही जर ट्रेनने प्रवास करत असाल आणि तुम्हाला त्या ट्रेनचे स्टेटस् जाणून घ्यायचे असेल तर आयआरसीटीसीने एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. यासाठी भारतीय रेल्वेने मेक माय ट्रिपसोबत भागीदारी केली आहे.
आता तुमच्या ट्रेनचे स्टेटस् काय आहे, हे तुमच्या व्हॉटस् अॅपवरच समजणार आहे. त्याचबरोबर पुढील स्टेशन कोणते आहे, कोणते स्टेशन येऊन गेले याचीही माहिती मिळेल. यासाठी आता १३९ हा क्रमांक डायल करावा लागणार नाही, किंवा इतर कोणतेही अॅप घ्यावे लागणार नाही.
व्हॉटस् अॅपवर माहिती जाणून घेण्यासाठी मेक माय ट्रिपचा ७३४९३८९१०४ हा क्रमांक मोबाईल मध्ये सेव्ह करावा लागेल. नंतर त्या क्रमांकावर ट्रेनचा नंबर टाईप करून मेसेज सेंड करा. मेसेज पाठवताच तुम्हाला हवे असलेल्या ट्रेनचे स्टेटस् मिळेल.
तथापि, प्रवाशांना हे सुनिश्चित करावे लागेल की, त्यांचा ट्रेन नंबरचा मेसेज सर्व्हर पर्यंत पोहचत नाही तोपर्यंत व्हॉटस् अॅपवर दोन निळ्या रंगाच्या खुणा दिसत नाहीत. यासाठी तुम्हाला तुमचे व्हॉटस् अॅप अपडेट करावे लागणार आहे.
याच पध्दतीने पीएनआर नंबर व्हॉटस् अॅपवर मेसेज करा, तुम्हाला तुमच्या तिकीटाचे स्टेटसही मिळेल.

Comments
Post a Comment