Skip to main content

Zomato ने लॉन्च केली PiggyBank सुविधा, प्रत्येक ऑर्डरवर मिळणार डिस्काउंट

             

             झोमॅटो ने आपल्या फूड डिलिवरी अॅपमध्ये एक नवीन सुविधा पिग्गी बँकचा समावेश केला आहे. या सर्व्हिसमध्ये युजर्सला त्यांच्या ऑर्डरच्या १०% झोमॅटो क्रेडिट स्वरूपात मिळणार आहे. ह्या क्रेडिटला (Z coins) झेड कॉइन हे नाव देण्यात आले आहे. हे क्रेडिट पुढच्या ऑर्डर वेळेस १०%  सुट म्हणून वापरता येईल.

               सुरुवातीला ही सुविधा केवळ मोजक्याच युजर्सला देण्यात आली आहे. कंपनीकडून जॉइनिंग बोनस म्हणून २०० झेड कॉइन देण्यात आले आहेत. कंपनी ही सर्व्हिस जे युजर्स एका महिन्यात ५ पेक्षा जास्त वेळा खाद्यपदार्थ ऑर्डर देतात, त्यांनाच देण्याचा विचार करत आहे. अश्या युजर्सला लॉयलिटी सेगमेंट मध्ये समाविष्ट केले गेले आहे. तसेच झोमॅटो गोल्ड युजर्सला देखील ही सुविधा उपलब्ध होणार आहे.


               जर तुम्ही लॉयलिटी सेगमेंटमध्ये समाविष्ट नसाल अथवा गोल्ड युजर्स नसाल तर तुम्हाला ह्या सर्विसचा उपयोग घेता येणार नाही. जर एखाद्या पिग्गी बँक युजरने ही सुविधा तुम्हाला रेफर केली तर तुम्ही ही सर्व्हिस वापरू शकता.

               येथे लक्षात घेण्यासारखी एक बाब आहे की, ही सर्व्हिस फ्री नाही. या सेवेसाठी वापरकर्त्याला दोन महिन्यानंतर २९९ ₹ प्रतिवर्ष द्यावे लागतील. झोमॅटो शिवाय Swiggy आणि Foodpanda हेही ऑनलाईन खाद्यपदार्थ ऑर्डर सेवा पुरवतात.

Comments