Skip to main content

आपलं फेसबुक प्रोफाईल कोणी कोणी पाहिलं कसे जाणून घ्याल..?


              फेसबूक ही सोशल मीडिया साईट जगभरात प्रसिद्ध आहे. वैयक्तिक आणि व्यायसायिक अशा दोन्ही प्रकारे फेसबुकचा वापर करता येतो. काही वेळा आपण इतरांचे प्रोफाईल चेक करतो. तसंच आपलं प्रोफाइल कोण चेक करतं का ? हा प्रश्न देखील आपल्याला पडतो.
              पण आता ही उत्सुकता ताणण्याची काही आवश्यकता नाही. कारण अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही हे जाणून घेऊ शकता.

 स्टेप १ :
गुगल क्रोममध्ये उजव्या बाजूला दिलेल्या डॉट वर क्लिक करा. त्यात सेटिंग्सवर क्लिक करा. त्यानंतर एक नवीन विंडो ओपन होईल. मग सर्च बॉक्समध्ये extensions लिहून एंटर करा. मग स्क्रीनवर खूप ऑपशन्स येतील. त्यातील Get more extensions वर क्लिक करा.

स्टेप २ :
Get more extensions वर क्लिक केल्यावर नवीन विंडो ओपन होईल. मग डाव्या बाजूला दिलेल्या सर्च ऑप्शनमध्ये Flatbook लिहून एंटर करा. अॅड ऑप्शन येईल. Flatbook अॅड झाल्यावर प्रोसेस पूर्ण होईल. मग तुम्हाला कळेल की कोणी कोणी तुमचे प्रोफाईल चेक केले आहे.

Comments

Popular posts from this blog

पतंजलीने बीएसएनएल सोबत हात मिळवणी करत, लाँच केले स्वदेशी सिम कार्ड प्लॅन

            योगगुरू बाबा रामदेव यांच्या पतंजली समूहाने भारत संचार निगम लिमिटेड बरोबर हात मिळवणी करून दूरसंचार क्षेत्रात योजना आखली आहे. या योजनेला " स्वदेशी समृद्धी कार्ड " असे नाव देण्यात आले आहे. सध्या सुरुवातीला हे सिमकार्ड केवळ पतंजलिच्या कर्मचाऱ्यांसाठीच उपलब्ध आहे. तर जाणून घेऊयात काय आहे बीएसएनल व पतंजलीचा "स्वदेशी समुर्द्धि प्लॅन" ? काय आहे प्लॅन..? १) १४४ रु., ३० दिवस : या मध्ये १४४ रुपयांचे रिचार्ज केल्यास युझरला देशभरात अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळणार आहे. यासोबतच ३० दिवसांकरिता प्रती दिन २ जीबी डेटा आणि १०० एसएमएसची सुविधाही मिळणार आहे. २) ७९२ रु., १८० दिवस : या मध्ये ७९२ रुपयांचे रिचार्ज केल्यास युझरला देशभरात अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळणार आहे. यासोबतच १८० दिवसांकरिता प्रती दिन २ जीबी डेटा आणि १०० एसएमएसची सुविधाही मिळणार आहे. ३) १५८४ रु., ३६५ दिवस : या मध्ये १५८४ रुपयांचे रिचार्ज केल्यास युझरला देशभरात अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळणार आहे. यासोबतच १८० दिवसांकरिता प्रती दिन २ जीबी डेटा आणि १०० एसएमएसची सुविधाही मिळणार आहे. ...