भारतात वापरले जाणारे पाचपैकी चार स्मार्टफोन हे अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टम वर चालतात. स्मार्टफोन घेताना अनेक गोष्टी पाहिल्या जातात. पण फोन घेतल्यावर अनेकजण हे फोनच्या सुरक्षेकडे अजिबातच लक्ष देत नाहीत. असेही म्हणता येईल की, अनेकांना फोनमधील सिक्युरिटी फिचर्सबाबत काहीच माहित नसत. त्यामुळे काहीवेळेस अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. हा त्रास होऊ नये म्हणून फोनच्या सुरक्षेबाबत काही खास गोष्टी...
योग्य पासवर्डची निवड..
तुमचा फोन सुरक्षित करण्यासाठीची ही पहिली महत्त्वाची स्टेप आहे. प्रत्येक फोनमध्ये सेक्युरिटीसाठी पासकोड लॉक असतो आणि आता तर जास्तीत जास्त स्मार्टफोनमध्ये सेक्युरिटीसाठी फ्रिंगरप्रिंट स्कॅनर फिचर दिलं जातंय. पासकोड सेट करताना तो फार काळजीपूर्वक निवडावा. सहज कुणाला कळेल किंवा अंदाज बांधता येईल असा असू नये. जन्मतारीख, कारचा नंबर किंवा मोबाईल क्रमांक अजिबात असू नये.
फोन आणि अॅपस ठेवा अपडेटेड
अँड्रॉइड फोनच्या सुरक्षेसाठी दुसरी स्टेप म्हणजे आपला फोन अपडेटेड ठेवावा. गुगल सतत सर्वच स्मार्टफोनसाठी नवीन सिक्युरिटी अपडेट्स आणत असतो. त्यामुळे आपला फोन अपडेटेड ठेवावा.
याचप्रकारे अॅप डेव्हलपर्स सतत प्ले स्टोअरवर आपल्या अॅप्सचे नवे फिचर्स आणि सिक्युरिटी अपडेट देत असतात. अपडेट इंस्टॉल करण्याआधी माहितीही दिलेली असते की अपडेटेड अॅपमध्ये कोणते फिचर्स दिले जाणार आहेत. त्यामुळे कोणत्याही अडचणीशिवाय अॅपचं काम चालावं यासाठी अॅप अपडेट करत राहावे.
कोणते अॅप्स डाऊनलोड करता..
गुगल प्ले स्टोअरवर युजर्ससाठी असलेल्या अॅप्सच्या तपासणीसाठी एक वेगळं डिपार्टमेंट आहे. हे डिपार्टमेंट असे अॅप्स युजर्सपर्यंत पोहोचण्याआधीच हे अॅप डिलिट करतात. पण आणखीही काही वेगळे सोर्सेस आहेत जेथून हे अॅप डाऊनलोड केले जाऊ शकतात. पण ते सुरक्षित आहेत की नाही हे चेक करण्यासाठी कोणतीही व्यवस्था नाही. त्यामुळे माहित नसलेल्या सोर्सवरून अॅप्स डाऊनलोड करणे डिसेबल करा. यासाठी सेटिंगमध्ये जाऊन सिक्युरिटीमध्ये "Install apps from Unknown Sources" हा पर्याय ऑफ करा.

Comments
Post a Comment