Skip to main content

व्हॉट्सअॅपऐवजी गुगल ड्राईव्ह वर स्टोअर होणार व्हॉट्सअॅप बॅकअप

whatsapp backup google drive
  व्हॉट्सअॅपऐवजी गुगल ड्राईव्ह वर स्टोअर होणार व्हॉट्सअॅप बॅकअप

                  व्हॉट्सअॅप लवकरच आपल्या सिस्टम मध्ये एक नवा बदल करणार आहे. गुगल आणि व्हॉट्सअॅप यांच्यात एक नविन करार झाला आहे. त्याकरारानुसार  व्हॉट्सअॅप त्याच्या सिस्टम मध्ये बदल करत युजर्सचा डेटा डिलिट करणार आहे. यामध्ये व्हॉट्सअॅप चॅट, व्हिडिओ, फोटो आणि ऑडियोचा समावेश असेल.

                   गुगलने व्हॉट्सअॅप युजर्सचा डेटा सबंधित गुगल ड्राईव्ह वर साठवण्यास मान्यता दिली आहे. आणखी एक महत्वाची बाब म्हणजे यासाठी गुगल कडून मोफत देण्यात येणाऱ्या १५ जीबी स्पेसचा वापर होणार नसून, अतिरिक्त जागेत हा बॅकअप साठवण्यात येणार आहे.

                  व्हॉट्सअॅप लवकरच आपला डेटा डिलिट करणार आहे. व्हॉट्सअॅपचा डेटा नोव्हेंबर महिन्यापासून  व्हॉट्सअॅपऐवजी गुगलवर स्टोअर होणार, त्यामुळे आतापर्यंतचा डेटा हवा असल्यास वेळीच बॅकअप घ्यावा लागेल. तस नाही केल्यास तुमचा सर्व डेटा नष्ट होईल.

तर कसा घ्याल व्हॉट्सअॅपचा बॅकअप...

१) व्हॉट्सअॅप उघडा.
२) सेटिंग्ज मध्ये क्लिक करा. आणि त्यानंतर चॅट बॅकअप वर क्लिक करा.
३) गुगल अकाउंट सेट करा.
४) त्यानंतर बॅकअप वर क्लिक करा. (तुम्ही बॅकअप घेण्याचा कार्यकाळ ठरवू शकता.)

Settings --> Chats -->Chat backup -->BACK UP.

Comments