Skip to main content

व्हॉटस् अॅपने आणले ग्रुप कॉलिंगचे नवे फिचर



               जगभरातील युजर्सना आकर्षित करण्यासाठी व्हॉटस् अॅपकडून सतत  नवीन फिचर्स आणले जातात. गेल्यावेळी फेसबुकच्या एफ ८ डेव्हलपर कॉन्फरन्स मध्ये व्हॉटस् अॅपने घोषणा केली होती की, ते यावर्षी व्हॉईस आणि व्हिडिओ सपोर्टसह ग्रुप कॉलिंगची देखील सुविधा आणणार आहेत.
                आता व्हॉटस् अॅपने माहिती दिली आहे की, हे फिचर मंगळवार ३१ जुलै पासून जगभरात लाईव्ह झालं आहे. अँड्रॉइड आणि आयओएस असे दोन्ही युजर्स याचा वापर करू शकणार आहेत.
                  व्हॉटस् अॅपचे ग्रुप कॉलिंग फिचर एका वेळेला चार लोकांना सपोर्ट करते. हे चार लोकं कोठेही असले तरी याचा वापर करू शकतील. या नव्या फिचरमुळे युजर्स एकावेळी जास्तीत जास्त ४ जणांना व्हिडिओ किंवा व्हॉईस कॉल करू शकतो.
                 व्हॉटस् अॅपच्या मते, मागील काही वर्षांपासून युजर्सने व्हॉईस आणि व्हिडिओ कॉलिंगचा आनंद घेतला आहे. आम्ही या गोष्टीची घोषणा करताना खूप उत्साहित आहोत की आता ग्रुप कॉलिंगची सुविधा देखील सुरू झाली आहे. व्हॉटस् अॅप युजर्सला कंपनीने विश्वास दिला आहे की, त्यांचे सर्व मेसेज आणि ग्रुप कॉल एंड-टू- इनक्रिप्टेड आहे. त्यामुळे प्रायव्हसी बाबतीत जे लोकं चिंतीत आहेत, त्यांना आता काळजी करण्याची गरज नाही.

Comments