फेसबुकच्या मालकीचा व्हॉटस् अॅप येत्या काही दिवसात त्याच्या स्टेटस् मध्ये जाहिराती दर्शविण्यास प्रारंभ करू शकतो. दि वॉल स्ट्रीट रिपोर्टनुसार, लोकप्रिय मेसेजिंग प्लॅटफॉर्मने कंपन्यांना थेट संपर्क साधण्यास परवानगी दिली आहे.
व्हॉटस् अॅपच्या अवहालानुसार, कंपनी पुढील वर्षापासून आपल्या स्टेटस् वैशिष्ट्यामध्ये जाहिराती सादर करेल. यामुळे कंपन्यांना ग्राहकांना कॉल करण्याऐवजी व्हॉटस् अॅपद्वारे थेट वापरकर्त्यांना मजकूर पाठवण्याची अनुमती मिळेल. व्हॉटस् अॅपने याआधीच काही कंपन्यांसह याची चाचणी सुरू केली आहे. या सेवेतून महसूल निर्मितीचा विचार असून या सेवेकरिता कंपन्यांकडून शुल्क आकारण्यात येणार आहे.
कंपनी नवीन जाहिरातीचा प्रकार सादर करेल जेणेकरून वापरकर्त्यांना हे कळू शकेल की कोणत्याही ग्राहक सेवा वा प्रश्नासाठी कंपन्यांना थेट कॉलिंग ऐवजी या सेवेचा वापर करू शकतात. सिंगापुर एअरलाइन्स, ई कॉमर्स कंपनी आणि उबेरसारख्या १०० कंपन्या या वैशिष्ट्यांचे परीक्षण करत आहेत.
ही सुविधा नवीन नसून फेसबुकच्या मालकीच्या इमेज शेअरिंग प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर आधीपासूनच सुरू आहे. इंस्टाग्रामवर स्टोरिजमध्ये विविध कंपन्यांची जाहिरात दाखवली जातात. तिचं संकल्पना आता व्हॉटस् अॅपमध्ये समाविष्ट करण्यात येणार आहे.
Comments
Post a Comment