![]() |
| Happy Birthday Google |
गुगल आता २० वर्षाचे झाले आहे. गुगल तयार होण्याच्या इतिहास अत्यंत रोचक आहे. लॅरी पेज यांच्या बॅकरब प्रकल्पाचे नाव बदलून गुगल करण्यात आले होते.
गुगोल शब्दापासून बनवला गुगल
सर्जेई ब्रिन आणि पेज स्टॅनफोर्ड विद्यापिठाच्या डॉरमेट्री मध्ये एकत्र राहत होते. त्यांच्या खोलीत त्यांनी अनेक कॉम्प्युटर खरेदी करून जमा केले होते. त्याच ठिकाणी त्यांनी संशोधन प्रकल्प म्हणून सर्च इंजिन बनवले. त्यावेळी इंटरनेटवर काहीही शोधण्यासाठी प्रत्येक पेजवर त्याची लिंक पाहावी लागत होती. त्यामुळे ब्रिन आणि यांचा हा प्रकल्प अत्यंत लोकप्रिय झाला. त्यावेळी त्यांनी पीएचडीचे शिक्षण मधेच सोडून यावर काम करण्यास सुरुवात केली.
सुरुवातीला लारी पेज यांच्या "बॅकरब" नावाच्या याच प्रकल्पावर काम सुरू होते. ऑगस्ट १९९६ मध्ये त्याचे नाव बदलून गुगल ठेवण्यात आले. हे नाव त्यांनी "गुगोल" शब्दापासून घेतले आहे. या शब्दाचा अर्थ १० वर १०० चा घात असा होतो. याचा पहिला व्हर्जन स्टॅनफोर्ड च्या साइटवर दिसले होते. ते या दोघांनी अनेक कॉम्प्युटर जोडून बनवले होते. मात्र, ही प्रणाली इतकी जास्त बँडविथवर चालायची की स्टॅनफोर्डचे बाकी इंटरनेट कनेक्शन बंद होत होते.
याहूला विक्री करण्याची होती इच्छा
पेज आणि ब्रिन यांनी १९९८ मध्ये सर्च इंजिन याहुला गुगल विक्री करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, ते जमले नाही. १९९९ मध्ये दोघांनी एक्साईट नावाच्या कंपनीलाही विक्रीचा प्रयत्न केला. त्यावेळी एक्साईट याहू नंतर दुसरे सर्वात मोठे सर्च इंजिन होते. त्यांनी गुगलसाठी १० लाख डॉलर (त्यावेळी ४ कोटी रुपये) मागितले होते. मात्र कंपनी तयार होत नसल्याचे पाहून त्यांनी किंमत कमी करून ७.५ लाख डॉलर (३ कोटी रुपये) केली. तरी देखील एक्साईटचे सीईओ जॉर्ज बेल आणि व्हेंचर कॅपिटलिस्ट विनोद खोसला यांनी या कराराला मंजुरी दिली नाही. आज गुगलचे मूल्य ५९ लाख कोटी रुपये आहे.

Comments
Post a Comment