Skip to main content

गुगलची तुमच्या भविष्यावर गुपचूप नजर


          लोकेशन ऑफ असूनही गुगल युजर्सना ट्रॅक करते, असे अलीकडेच समोर आले आहे. पण हे झाले केवळ लोकेशनच्या बाबतीत. गुगल आपल्या प्रत्येक हालचाली, कामाला ट्रॅक करते. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर गुगलने तुमचा डेटा आणि इंटरनेटशी संबंधित गोष्टी ट्रॅक केल्या तर ते तुमचे भविष्यही सांगू शकते. तेही अगदी काही मिनिटांत.

गुगल २४ तास अशी करते आपल्यावर निगराणी

१) गुगलचे अॅप्स सर्व्हरवर पाठवतात लोकेशन
             गुगलचे मशीन लेव्हल प्रोग्रामिंग असे आहे, जे अॅप युजर्सचे लोकेशन ट्रॅक करते आणि सर्व्हरवर पाठवते. गुगल मॅप्स , व्हॉईस, जीमेल, क्रोम हे सर्व अॅप्स लोकेशन ट्रॅक करतात. त्याची माहिती गुगल सर्व्हरला देतात, त्याला हिस्ट्री म्हणतात. त्यामुळे लोकेशन बंद केले तरी तुम्ही कोठे आहात याची माहिती मिळते. एका अहवालानुसार, अँड्रॉइड फोन लोकेशनही संबंधित ४० इनपुट प्रतितास आणि आयफोन ४ इनपुट प्रतितास पाठवतात. गुगल तुमचे जीपीएस लोकेशन आणि जवळच्या सेलफोन टॉवरच्या लोकेशनचेही रेकॉर्ड ठेवते.

२) आपण काय सर्च करतो हे शोधतात कुकीज
              इंटरनेटवर तुम्ही काय शोधता हे गुगलला माहित असते. गुगलच्या काही कुकीज अश्या आहेत, ज्या मॅक आयडी आणि आयपी अॅड्रेसच्या आधारे युजर कोण आहे याची माहिती मिळवतात. वारंवार एकच माहिती आल्यास, सामान्यतः ही व्यक्ती काय सर्च करते याची माहिती मिळते. अशाच प्रकारे जर आपल्या जीमेल आयडिने सर्च केलेल्या सर्व गोष्टींची माहिती गुगलला मिळत आहे. गुगल आयडेंटिफायर कुकीजही तुमच्या संगणकात इंस्टॉल करतात.

३) तुम्ही काय सेव्ह करता ?
              आपण अनेकदा गुगलचे फोटो अॅप किंवा क्लाऊडमध्ये स्वतःच्या कुटुंबाची छायाचित्रे अपलोड करतो. ती सुरक्षित असतात व कुणाशी शेअरही केली जात नाहीत; परंतु ती गुगलकडे सेव्ह होत असतात. केवळ छायाचित्रेच नव्हे, तर त्याची संपूर्ण माहितीदेखील गुगलकडे जाते. जसे तुम्ही एखादे छायाचित्र किती एडिट केले, कुणाला टॅग केले, कोणत्या शहरात व किती वाजता ते छायाचित्र काढले, इ.

गुगलला माहित आहेत तुमच्या या गोष्टी

१) नाव २) जन्मदिवस ३) लिंग ४) मोबाईल क्रमांक ५) तुमचे गुगल सर्च ६) ज्या वेबसाईटवर तुम्ही गेलात त्या ७) तुमचा पत्ता ८) पूर्वी तुम्ही कुठे गेलात / राहिलात ९) आवडीचा चित्रपट, गाणे, खेळ, ठिकाण १०) कुठे काम करता ११) मेल १२) व्हॉईस १३) फोटो १४) फोनबुक / संपर्क १५) वापरत असलेले अॅप १६) १७) आवड - नावड १८) जास्त काय खरेदी का?

यावर कसे मात कराल...?

✓ लोकेशन हिस्ट्री वाचवण्यासाठी डेटा अँड पर्सनलायझेशन टॅब मध्ये लोकेशन हिस्ट्री सेटिंग ऑफ करा.
✓ जीपीएस सिग्नल्स गरज असेल तरच ऑन करा.वेबअॅक्टिव्हिटी ट्रॅकिंगपासून वाचण्यासाठी गुगल अकाउंट सेटिंगमध्ये डेटा अँड पर्सनलायझेशन टॅब मध्ये वेब अँड अॅप अॅक्टिव्हिटी ऑफ करा.
✓ गुगल व्हॉईस सर्चचा  डेटाही सेव्ह ठेवतो. तो आपण व्हॉईस अँड ऑडियो पेजमध्ये जाऊन पाहू शकतो आणि डिलिट करू शकतो.
✓ फोटो अपलोड करण्याआधी कॅमेरा अॅपमध्ये ऑल अॅप सेक्शन्मध्ये सेव्ह लोकेशन ऑप्शन ऑफ करा.
गुगल फोटोजमध्ये मेन्यू सेटींगमध्ये जिओलोकेशन बंद करा.
✓ गुगल आपल्या जाहिरातदारांकडून आपल्या सर्चद्वारे आपली आवड समजून घेवून जाहिराती दाखवते. त्यामुळे आपला सर्व सर्च डेटा गुगलकडे जातो. ते रोखण्यासाठी अॅड सेटिंगमध्ये अॅड पर्सनलायझेशन ऑफ करू शकता.

Comments

Popular posts from this blog

पतंजलीने बीएसएनएल सोबत हात मिळवणी करत, लाँच केले स्वदेशी सिम कार्ड प्लॅन

            योगगुरू बाबा रामदेव यांच्या पतंजली समूहाने भारत संचार निगम लिमिटेड बरोबर हात मिळवणी करून दूरसंचार क्षेत्रात योजना आखली आहे. या योजनेला " स्वदेशी समृद्धी कार्ड " असे नाव देण्यात आले आहे. सध्या सुरुवातीला हे सिमकार्ड केवळ पतंजलिच्या कर्मचाऱ्यांसाठीच उपलब्ध आहे. तर जाणून घेऊयात काय आहे बीएसएनल व पतंजलीचा "स्वदेशी समुर्द्धि प्लॅन" ? काय आहे प्लॅन..? १) १४४ रु., ३० दिवस : या मध्ये १४४ रुपयांचे रिचार्ज केल्यास युझरला देशभरात अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळणार आहे. यासोबतच ३० दिवसांकरिता प्रती दिन २ जीबी डेटा आणि १०० एसएमएसची सुविधाही मिळणार आहे. २) ७९२ रु., १८० दिवस : या मध्ये ७९२ रुपयांचे रिचार्ज केल्यास युझरला देशभरात अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळणार आहे. यासोबतच १८० दिवसांकरिता प्रती दिन २ जीबी डेटा आणि १०० एसएमएसची सुविधाही मिळणार आहे. ३) १५८४ रु., ३६५ दिवस : या मध्ये १५८४ रुपयांचे रिचार्ज केल्यास युझरला देशभरात अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळणार आहे. यासोबतच १८० दिवसांकरिता प्रती दिन २ जीबी डेटा आणि १०० एसएमएसची सुविधाही मिळणार आहे. ...