Happy Birthday Google गुगल आता २० वर्षाचे झाले आहे. गुगल तयार होण्याच्या इतिहास अत्यंत रोचक आहे. लॅरी पेज यांच्या बॅकरब प्रकल्पाचे नाव बदलून गुगल करण्यात आले होते. गुगोल शब्दापासून बनवला गुगल सर्जेई ब्रिन आणि पेज स्टॅनफोर्ड विद्यापिठाच्या डॉरमेट्री मध्ये एकत्र राहत होते. त्यांच्या खोलीत त्यांनी अनेक कॉम्प्युटर खरेदी करून जमा केले होते. त्याच ठिकाणी त्यांनी संशोधन प्रकल्प म्हणून सर्च इंजिन बनवले. त्यावेळी इंटरनेटवर काहीही शोधण्यासाठी प्रत्येक पेजवर त्याची लिंक पाहावी लागत होती. त्यामुळे ब्रिन आणि यांचा हा प्रकल्प अत्यंत लोकप्रिय झाला. त्यावेळी त्यांनी पीएचडीचे शिक्षण मधेच सोडून यावर काम करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला लारी पेज यांच्या "बॅकरब" नावाच्या याच प्रकल्पावर काम सुरू होते. ऑगस्ट १९९६ मध्ये त्याचे नाव बदलून गुगल ठेवण्यात आले. हे नाव त्यांनी "गुगोल" शब्दापासून घेतले आहे. या शब्दाचा अर्थ १० वर १०० चा घात असा होतो. याचा पहिला व्...
लोकेशन ऑफ असूनही गुगल युजर्सना ट्रॅक करते, असे अलीकडेच समोर आले आहे. पण हे झाले केवळ लोकेशनच्या बाबतीत. गुगल आपल्या प्रत्येक हालचाली, कामाला ट्रॅक करते. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर गुगलने तुमचा डेटा आणि इंटरनेटशी संबंधित गोष्टी ट्रॅक केल्या तर ते तुमचे भविष्यही सांगू शकते. तेही अगदी काही मिनिटांत. गुगल २४ तास अशी करते आपल्यावर निगराणी १) गुगलचे अॅप्स सर्व्हरवर पाठवतात लोकेशन गुगलचे मशीन लेव्हल प्रोग्रामिंग असे आहे, जे अॅप युजर्सचे लोकेशन ट्रॅक करते आणि सर्व्हरवर पाठवते. गुगल मॅप्स , व्हॉईस, जीमेल, क्रोम हे सर्व अॅप्स लोकेशन ट्रॅक करतात. त्याची माहिती गुगल सर्व्हरला देतात, त्याला हिस्ट्री म्हणतात. त्यामुळे लोकेशन बंद केले तरी तुम्ही कोठे आहात याची माहिती मिळते. एका अहवालानुसार, अँड्रॉइड फोन लोकेशनही संबंधित ४० इनपुट प्रतितास आणि आयफोन ४ इनपुट प्रतितास पाठवतात. गुगल तुमचे जीपीएस लोकेशन आणि जवळच्या सेलफोन टॉवरच्या लोकेशनचेही रेकॉर्ड ठेवते. २) आपण काय सर्च करतो हे शोधतात कुकीज ...